Monday, August 25, 2008

Krushn ..

तुला नाही सूर्य झाकता आला
आणि घूँघट ओढून अंधार झाला ,असा देखावाही नाही करता आला
राधे ,तुझ्या चेह्र्यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली .... मुकी कासाविस संध्याकाळ.,
आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला ...वणव्याचा केशरी जाल

अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं
बिनमोलाचं केलं अवघं आयुष्य एक निरोप घेण्यानं..
हात हललेला तू पाहिलास !
रथ चाललेला तू पाहिलास!
पण खिळून राहिलीस ठायिच , नाही धावलीस मागे आवेशानं..

कळलं न तुला
शेवटी मनापासून मन दूर जातं
तेंव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो ..
ना अंगाचा वास ,ना शपथांचा फास
श्वास अडतो की घुसमटतो याचा विचार ही नसतो ,जनारयाच्या मनात .
काल होते हात हातात , आज नाहीत .
संबंधाचा अर्थ सामवातो एवढ्याच साध्या वस्तुस्थीतित .

हवं ते हवं तेंव्हा घेतो तो , मिळवतो , खेळवतो ... मालावतो .
त्याच्यातून त्याच्याचसाठी उगवतात स्वीकार ..नकार
जग त्याच्याभोवती तो सहज वळवतो


त्याच्या ओळखीआड असते एक अदय अनोळख
तो यमुनेच्या जळात कधी कान्हा होउन हसतो ..
तर कधी कालिया होउन डसतो ..
राधे,, पुरूष असाही असतो ...

aruna dhere.

Anay ..

Anay ha Radhecha navra ..

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिनकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

Friday, August 1, 2008

Life in a Love ..(Robert Browning )

Life In A Love


Escape me?
Never---
Beloved!
While I am I, and you are you,
So long as the world contains us both,
Me the loving and you the loth
While the one eludes, must the other pursue.
My life is a fault at last, I fear:
It seems too much like a fate, indeed!
Though I do my best I shall scarce succeed.
But what if I fail of my purpose here?
It is but to keep the nerves at strain,
To dry one's eyes and laugh at a fall,
And, baffled, get up and begin again,---
So the chace takes up one's life ' that's all.
While, look but once from your farthest bound
At me so deep in the dust and dark,
No sooner the old hope goes to ground
Than a new one, straight to the self-same mark,
I shape me---
Ever
Removed!

Robert Browning